

हिंगणघाट : शेतातील धुऱ्यावर दुचाकी लावून शेतात कामासाठी गेलेल्या शेतक-याची चोरीला गेलेली दुचाकी हिंगणघाट पोलिसांनी विधीसंघर्षित बालकाकडून ताब्यात घेतली आहे. फिर्यादी संतोष किसनाजी येणोरकर (48) रा. गोमाजी वॉर्ड, हिंगणघाट यांनी मोपेड गाडी क्र. एम.एच. 32 एन. 1697 (किंमत 30 हजार ) शेताच्या धुऱ्यावरून चोरीला गेल्याची तक्रार 3 नोव्हेंबर रोजी हिंगणघाट पोलिस ठाण्यात दिली होती.
गुन्हा नोंद करून तपासात घेतला. तपासासाठी ठाणेदार संपत चव्हाण यांनी गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड यांना केलेल्या मार्गदर्शनानुसार गुन्हे प्रगटीकरण शोध पथकाने वेगाने तपास 1 चक्र फिरून विधीसंघर्षीत बालकाच्या ताब्यातून गुन्ह्यातील मोपेड गाडी क्र. एम. एच. 32 ए.एन 1697 हस्तगत केली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधीकारी दिनेश कदम, ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे विवेक बनसोड, शेखर डोंगेर, पंकज घोडे, प्रशांत बाटखेडे, उमेश बेले यांनी केली.