राष्‍ट्रीय शिक्षण धोरणात भारताचे भाग्‍य बदलविण्‍याचे सामर्थ्‍य आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

वर्धा : राष्‍ट्रीय शिक्षण धोरणाला एक वर्ष पूर्ण झाल्‍यानिमित्‍य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (29 जुलै) ‘विद्या प्रवेश’, ‘निष्‍ठा 2.0’, सफल, एनडीएआर, ‘एकेडेमिक बैंक ऑफ क्रेडिट’ या कार्यक्रमांची सुरुवात केली.

शिक्षण समुदायाला संबोधित करतांना पंतप्रधान म्‍हणाले की राष्‍ट्रीय शिक्षण धोरण 2020 ला आधार बनवून अनेक नवीन निर्णय घेतले गेले. राष्‍ट्रीय शिक्षण धोरण स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाचा एक महत्‍वाचा भाग बनला आहे. राष्‍ट्रीय शिक्षण धोरणातील कार्यक्रमात भारताचे भाग्‍य बदलविण्‍याचे सामर्थ्‍य आहे. ते म्‍हणाले की ‘राष्‍ट्रीय शिक्षण ख-या अर्थात राष्‍ट्रीय होण्‍यासाठी त्‍यात राष्‍ट्रीय परिस्थितीचे प्रतिबिंबित दिसले पाहिजे’ गांधीजींच्‍या या दूरदर्शी विचाराला पूर्ण करण्‍यासाठी स्‍थानीय भाषेत शिक्षणाचा विचार राष्‍ट्रीय शिक्षण धोरणात आहे आणि या दिशेत 8 राज्‍यातील 14 इंजीनियरिंग कॉलेज, 5 भारतीय भाषेमध्‍ये इंजीनियरिंगचे शिक्षण देणार आहे.

सुरवातील स्‍वागत भाषण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील कामगिरीवर एक लघु फिल्‍म प्रदर्शित करण्‍यात आली. ऑनलाइन माध्‍यमातून आयोजित कार्यक्रमाचे सजीव प्रसारण बघण्‍याची व्‍यवस्‍था महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयातील डॉ. श्‍यामा प्रसाद मुखर्जी विद्या भवनातील कस्‍तूरबा सभागृहात करण्‍यात आली. यावेळी विश्‍वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल, प्रकुलगुरू द्वय प्रो. हनुमानप्रसाद शुक्‍ल व प्रो. चंद्रकांत रागीट, कुलसचिव कादर नवाज़ ख़ान, विविध विद्यापीठांचे अधिष्‍ठातागण, विभागाध्‍यक्ष, अध्‍यापक व अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here