

आर्वी : दुचाकीवरुन दारु आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान दुचाकी चालकास अडवून तपासणी केली असता दारुसाठा मिळून आला. पोलिसांनी आरोपी प्रवीण श्रावण पखाले रा. आर्वी याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता आरोपीस तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
तळेगावकडून आर्वी कडे दारु वाहतूक होत असल्याचे पोलिसांना समजले, पोलिसांनी शिलाराम मंगल कार्यालयापुढे नाकाबंदी केली असता एम.एच.3१ डी.एफ. २१५४ क्रमांकाची दुचाकी भरधाव येताना दिसली. पोलिसांनी दुचाकीला अडवून पाहणी केली असता २४ हजार रुपयांचा देशीविदेशी दारुसाठा मिळून आला. पोलिसांनी दुचाकीसह एकूण ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला, ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात भगवान बावणे, भुषण निघोट, चंद्रशेखर वाढवे, राजू राऊत, मनोज भोमले यांनी केली असून पोलिसांनी दारुविक्रेत्यांवर आता करडी नजर ठेवली असून कारवाईचा सपाटा लावला.