नागपूर अमरावती महामार्गावर कारचा भीषण अपघातात! 3 जण जागीच ठार; एकाचा मृतदेह झाडावर, दुसरा गाडीत तर तिसरा नालीत फेकला गेला

0
294

वर्धा : वर्ध्यातील नागपूर अमरावती जाणाऱ्या महामार्गावर आज चिस्तूर गावा जवळ अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या कारच नियंत्रण सुटल्याने राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वरील नदीच्या दरीत कार कोसळून चालकासह 2 प्रवासी ठार झाला तर एक जण बचावला ही घटना सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.

आज दिनांक 30 जुलै 2021 चे पहाटेच्या दरम्यान तळेगांव नजीकच्या चिस्तुर गावाजवळ एका (MH 30 P 3214) क्रमांकाची स्विफ्ट डिझायर गाडीचा भीषण अपघात झाला आहे ज्यामध्ये तिघे जागीच ठार झाले तर एक जण आश्चर्यकारक वाचला आहे, मृतांमध्ये अमित गोयते वय 32 वर्ष रा बडनेरा, शुभम गारोडे वय 25 वर्ष रा अमरावती, आशिष माटे रा राजुरा जि अमरावती, हे तिघे जागीच ठार झाले असून तर शुभम भोयर हा सुखरूप वाचला आहे, हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे ,तर एकाचा मृतदेह हा झाडावर अडकला होता तर दुसरा गाडीत अडकला होता तिसरा मृतदेह बाजूला पडून होता.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असे सांगण्यात आले आहे. कारण मोठे पळसाचे झाड तोडून ही गाडी उडून बाजूला फेकली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, जमादार राजेश साहू, सुधीर डांगे, श्याम गहाट, राहुल अमोने, अनील चिलघर, देवेंद्र गुजर, विजय उईके, रमेश परबत यांनी मोठी कसरत करून मृतदेहांना उत्तरीय तपासणी साठी पाठवले. यामध्ये जळगाव येथील युवक कादर खान यांनी व बाकीच्या युवकांनी पोलिसांना मोठी मदत केली.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here