खोटी तक्रार करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करा! श्रमिक पत्रकार संघाचे संस्थाध्यक्षांना निवेदन

वर्धा : सेवाग्राम रुग्णालयातील डॉक्टरांनी पत्रकार रवीराज घुमे यांच्याविरुद्ध खोटी तक्रार पोलीस ठाण्यात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागल्याने खोटी तक्रार करणाऱ्या संबंधीत डॉक्टरविरुद्ध कारवाई करण्याची मागणी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सेवाग्राम रुग्णालयाचे संस्थाध्यक्षांकडे दिलेल्या निवेदनातन केली आहे.

पत्रकार रवीराज घुमे नातेवाईक मुलीला डेंगू झाल्याने कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यासाठी 29 जुलै रोजी घेऊन गेले होते. कर्तव्यावर असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी रुग्णाला भरती घेण्यास टाळाटाळ केली. यावेळी रुग्णाचे नातेवाईक पत्रकार रवीराज घुमे आणि डॉक्टर यांच्यात वादावादी झाली. दरम्यान घुमे यांनी वरिष्ठांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करीत रुग्णाला भरती घेत नसून, विलंब करीत असल्याचे सांगितले. वरीष्ठांनी डॉक्टरला भरती घेण्यास सांगितल्याने काही वेळाने रुग्णाला भरती करण्यात आले.

दरम्यान डॉक्टरांशी वादाबादी झाली तेव्हा डॉक्टर्सना कोणत्याही प्रकारची शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी, कामात अडथळा निर्माण केला नसताना तसे खोटे आरोप करून डॉक्टरांनी सेवाग्राम पोलिसात ३० जुलैला तक्रार दाखल केली. सेवाग्राम पोलिसांनी कोणतीही चौकशी व शहानिशा न करता बिविध कलमांसह महाविद्यालय वैद्यकीय सेवा अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. यामुळे पत्रकार रवीराज घुमे यांचा मानसिक छळ, आर्थिक नुकसान, सामाजिक अप्रतिष्ठा झाली. याबद्दल सेवाग्राम रुग्णालय संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाला निवेदन देऊन खोटी तक्रार दाखल करणाऱ्या डॉक्टर्सविरुद्ध कारवाई करण्याची मागणी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली.

व्यवस्थापनाशी झालेल्या बैठकीवेळी संस्थाध्यक्ष, सचिव, अधिष्ठाता व रुग्णालयाचे अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रबोण धोपटे, उपाध्यक्ष गजानन गावंडे, रमेश निमजे, सहसचिव प्रफुल्ल व्यास, रुपेश खैरी, संजय बोंडे, प्रशांत आजनकर, बाळा चतारे, मराठी पत्रकार संघाचे प्रमोद पाणबुडे, एकनाथ चौधरी, पत्रकार संरक्षण समितीचे योगेश कांबळे, प्रकाश झांझडे यांच्यासह विविध पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here