प्रेमाच्या त्रिकोणातून अल्पवयीन मुलींची ‘ताईगिरी’! कथित प्रियकाराशी मिळून मारहाण; मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

वर्धा : प्रेम हे प्रेम असतं… तुमचं आमचं सेम असतं… या म्हणीप्रमाणे सध्या तरुण पिढीवर प्रेमाचे आकर्षण आहे. मात्र, प्रेमाचा केव्हा ‘गेम’ होतो. हे समजतच नाही. अशीच घटना शहरातील आयटीआय टेकडीवर सोमवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडली. अल्पवयीन मुलीने तिच्या कथित ‘बॉयफ्रेंड’च्या मदतीने एका १५ वर्षीय मुलीला चांगलेच बदडले असून तिच्यावर सावंगी येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

१५ वर्षीय मुलगी ही शिकवणीमध्ये बसून असताना १६ वर्षीय मुलीच्या कथित ‘बॉयफ्रेंड’चा फोन आला आणि शिवीगाळ करून धमकी देऊ लागला. तू मला कसा काय मेसेज केला, असे म्हणत तिला आयटीआय टेकडी परिसरात बोलाविले. अल्पवयीन मुलगी भीतीपोटी तेथे गेली असता तिला दुसऱ्या मुलीने शिवीगाळ करीत माझ्या ‘बॉयफ्रेंड’ला मेसेज का केले, असे म्हणू लागली. मुलीने ते फेक अकाउंट असून मी मेसेज केले नसल्याचे वारंवार सांगूनही त्या मुलीने व तिच्या कथित प्रियकराने त्या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपस्थित तिच्या मित्र-मैत्रिणींनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला; पण तरीही ती मुलगी ऐकत नव्हती. अखेर त्या मुलीला सावंगी येथील अतिदक्षता विभागात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here