गांगापूर शिवारात कार उलटली! ट्रकने कट दिल्याने कार झाली अनियंत्रित; कारचा चुराडा

वडनेर : नजीकच्या गांगापूर शिवारात भरधाव असलेल्या ट्रकने कारला कट दिल्याने कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित वाहनावर नियंत्रण मिळवित असताना कार रस्त्यावरून खाली उतरुन शेतात जात उलटली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील चालक व डॉक्टर थोडक्यात बचावले.

कारचालकासह डॉ. रवीकुमार मडावी हे त्याच्या एम.एच. ४० के. बी. ७९२२ क्रमांकाच्या कारने पोहणा येथील रुग्णालयात जात होते. भरधाव कार नागपूर-हैद्राबाद मार्गावरील गांगापूर शिवारातील बसस्थानकाजवळ आली असता वडकीकडून नागपूरच्या दिशेने रॉगसाईड येणाऱ्या भरधाव ट्रकने कारला धडक दिली. अशातच कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना कार रस्त्याच्याकडेला असलेल्या तुळशीराम गोंदे यांच्या शेतात शिरून उलटली. यात कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील दोघेही थोडक्यात बचावले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी वानखेडे, अजय रिठे, प्रवीण बोधाने यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here