सामूहीक अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात देवळीत अाक्रोश! उत्तरप्रदेश सरकारचा निषेध

देवळी : उत्तरप्रदेशात हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटने विरुद्ध संपूर्ण देशात संतप्त वातावरण असतांना देवळी शहरात युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने घटनेच्या निषेधार्थ जनअाक्रोश मशाल मार्च आयोजन करण्यात आला होता. या मशाल मार्चमध्ये देवळीतील असंख्य यूवक-यूवती, महिला-पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. शहीद अशोक गेडाम स्मारकाला वंदन करून जनआक्रोश मशाल मार्चला सुरवात झाली. सदर मशाल मार्चमध्ये युवक युवती महिलांनी हातात पेटती मशाल घेऊन महिला अत्याचार विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली.
“न्याय द्या न्याय द्या पीडितेला न्याय द्या”,”बलात्काऱ्यांना फाशी झालीच पाहिजे” “उत्तर प्रदेश सरकारचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दणानून टाकला. शहराच्या प्रमुख मार्गाने मशाल मार्च मार्गक्रमण करून स्थानिक आठवडी बाजार चौकात समारोप झाला. शेवटी समारोपीय कार्यक्रमात छोटेखानी सभा घेण्यात आली. यावेळी मशाल मार्चमध्ये सहभागी झालेल्या युवती, महिलांनी घटने विरुद्ध तीव्र शब्दात आपल्या भावनांना वाट मोकळी केली. यावेळी राजश्री देशमुख, वैष्णवी भुसारी, अर्चना मुन, जया गायधने, शालिनी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेवटी पिडीतेला उपस्थितांनी स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन जनआक्रोश मशाल मार्चची सांगता झाली. यावेळी किरण ठाकरे, गौतम पोपटकर, प्रवीण कात्रे, पवन महाजन, कृष्णकांत शेंडे,नितीन सायंकार,दिलीप वाघमारे, आनंद सांडे, प्रवीण ठाकरे, हारून तंवर, अजय इंगोले, प्रशांत चहारे, राम बासू, वैभव नगराळे, मनीष आदमने, दादाराव मुन, टिनू तंवर, मिरान पटेल, सुरेंद्र गांडोळे, आरती कपूर, नंदूरकर मॅडम, किशोर देशकर, जब्बार तंवर, अशोक वेळेकर, एकनाथ कांबळे, रिंकू ओझा, अमर मुरार, बबलू शेख, आकाश ढोरे, निलेश तिडके, प्रकाश खडगी, भारत फटींग, विजय पचारे, रिझवान तंवर व इतर शेकडो नागरिकांची उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here