शासकीय कार्यालयात आता अभ्यागतांना थेट प्रवेश नाहीच! निगेटिव्ह असणाऱ्यांनाच जिल्हाधिकारी कार्यालयात मिळेणार प्रवेश

वर्धा : कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीवही गमवावा लागल्याने आता प्रशासनाने शासकीय कार्यालयात थेट येणाऱ्यांवर बंधने घातली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांना कोरोना चाचणी निगेटिव्ह असेल, तरच प्रवेश दिला जाणार, असे फलक लावले आहे. तर, जिल्हा परिषदेतही प्रवेशावर निर्बंध घातले आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. तरीही, शासकीय कार्यालयात येणा-यांचीही संख्या वाढत असल्याने याला ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय कार्यालयात येणा-यांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अभ्यागतांना बाहेरूनच परत जावे लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना भेटण्यास निर्बंध राहतील.

तातडीच्या परिस्थितीत भेटायचे असल्यास ४८ तासांच्या आतील कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागणार आहे. तरच कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. तसेच अभ्यागतांनी कोविड वर्धा अँट जीमेल डॉट कॉमवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर निवेदने व अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी आवशयकता नसताना आरोग्याचा विचार करुन येथे गर्दी टाळण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here