हिंदी विश्‍वविद्यालयात ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ श्रमदान ; कारला चौक ते पोलिस कॉलनी मार्ग स्वच्छ

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर दरम्यान सुरू असलेल्या स्वच्छोत्सव अभियानांतर्गत, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी कारला चौक परिसरात स्वच्छता व श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ विश्वविद्यालयाचे कुलसचिव कादर नवाज खान यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, शोधार्थी आणि विद्यार्थी सहभागी झाले. त्यांनी कारला चौक ते पोलिस कॉलनी मार्ग यापर्यंत परिसराची स्वच्छता करून श्रमदान केले.

कार्यक्रमात नोडल अधिकारी डॉ. बालाजी चिरडे, सह-नोडल अधिकारी बी.एस. मिरगे, तसेच डॉ. एच.ए. हुनगुंद, डॉ. उमेश कुमार सिंह, डॉ. संदीप वर्मा, डॉ. मुन्‍नालाल गुप्‍ता, डॉ. हेमचंद्र ससाने, डॉ. प्रमोद जोशी, डॉ. आम्रपाल शेंदरे, डॉ. श्रीनिकेत कुमार मिश्र, डॉ. सीमा बर्गट, धीरज मसराम, सुधीर खरकाटे, मिथिलेश राय, हेमन्‍त कुमार दुबे, रामप्रसाद कुमरे, रविंद्र वानखडे, संदीप पेटकर, कुंडलीक वाघमारे, आशीष कुंभरे, प्रफुल राऊत, सतीश आडे, आकाश गवळी, सतीश डोंगरे, सुभाष कांबळे, प्रमोद चव्‍हाण, गीता राऊत, रोशनी उमाटे, पुष्‍पा गुबंडे, गणेश पडधाण, योगेश चिमणे, अनिल डोंगरे आणि मंगेश वाघमारे यांनी सहभाग घेतला. याशिवाय पिपरी व मेघे ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि स्वच्छता कामगार यांचा देखील सहकार्य लाभले.

स्वच्छोत्सव अभियान २ ऑक्टोबरपर्यंत चालेल. या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, ज्यात ‘एक पेड़ मेरे नाम’, निबंध लेखन, घोषवाक्य, पोस्टर, रील्स, भाषण, नुक्कड नाट्य अशा स्पर्धांचा समावेश आहे. याशिवाय विद्यापीठात स्वच्छता व सौंदर्यीकरण स्पर्धा, काव्यपाठ, विद्यार्थी वसतिगृह स्वच्छता व सौंदर्यीकरण स्पर्धा, प्रभातफेरी, सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान, पर्यावरण संवर्धनातील कार्य करणाऱ्या नागरिकांचा गौरव, तसेच २ ऑक्टोबर रोजी खादी वस्त्रांचे प्रदर्शन व विक्री यांचेही आयोजन केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here