वर्ध्यात ‘बर्ड फ्ल्यू’चा शिरकाव! मृत बदकाचे नमुने पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील पहिलीच घटना: नागरीकांमध्ये भितीचे वातावरण

राहुल काशीकर

वर्धा : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणार्‍या जिल्ह्यात आता ‘बर्ड फ्ल्यू’च्या संसर्गाने शिरकाव केला आहे. पवनार येथील शेतकरी जगदीश वाघमारे यांनी त्यांच्या शेतात पाळलेल्या मृत बदकांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणुन एक किलोमीटरचा परिसर ‘अ‍ॅलर्ट झोन’ घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील पक्षांचा शोध घेण्यात आला मात्र परिसरात ईतर कोणत्याच पशुपालकांकडे पक्षी नसल्याचे दिसुन आल्याने संसर्गाचा धोका टळला.

श्री वाघमारे यांच्याकडे त्यांनी पाळलेल्या १२ बदकांपैकी चार बदकांचा एक एक करुन मृत्यू झाला आणि सोबतच २२ कोंबड्यांचा मृत्यू झाला. याची माहिती पशुविभाकडे दिल्यानंतर या पक्षाची तपासनी केली असता त्यातील बदकांचा रिपोर्ड आज पॉझिटीव्ह अाला. रिपोर्ट येताच पशुविभागाची टिम घटनास्थळी दाखल होत खबरदारी घेत हा संसर्ग पसरु नये याकरीता शेतात असलेल्या ईतर बदकांना नष्ट करण्याची प्रक्रीया सुरु केली.

मरण पावलेल्या पक्षांचा एच ५ एन ८, या विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर गुरुवार (ता.२१) पशु विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. या पक्षांचा अहवालाची माहिती जिल्हाधिकारी यांना देऊन पक्षी व अंडी नष्ट करण्याची परवानगी घेण्यात आली.

यामध्ये येथील बदकाची एकुण २० अंडी आणि ८ बदक नष्ट करण्याची प्रक्रीया पार पडली येथील आठ जिवंत बदकांना आधी ईंजेक्शन द्वारे गुंगीचे औषध देण्यात आले त्यानंतर त्यांना मारुन त्याना खोल खड्ड्यात पुरण्यात आले. जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणावर नियंत्रणात आली असतानाच आता ‘बर्ड फ्ल्यू’चा धोका निर्माण झाला आहे. राज्यांत मागील काही दिवसांपासून ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव वाढत आहे. पाहता पाहता ‘बर्ड फ्ल्यू’ने वर्धा जिल्ह्यातही पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिक्रीया….

पवनार येथील शेतकर्यांच्या शेतातील पाळीव बदकामध्ये बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्यात H5N8 या विषानुचा संसर्ग आढळुन आला आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असली तरी पशुपालकांनी व नागरीकांनी घाबरुन जाण्याचे कारन नाही मात्र योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

प्रज्ञा डायगव्हाणे (गुल्हाने), जिल्हा पशु संवर्धन अधिकारी वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here