हिंगणघाट येथे रक्तदान शिबीर संपन्न; पतंजली योग समितीचा उपक्रम

हिंगणघाट : पतंजली योग समिती व विद्युतक्षेत्र तांत्रिक कामगार संघटना हिंगणघाट यांचे संयुक्त विद्यमाने येथील हरी ओम सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन शहालंगडीचे संत वासुदेव महाराज यांचे हस्ते पार पडले शिबीर प्रसंगी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, नगरसेविका शुभांगी डोंगरे, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, ठाणेदार बंडीवार, पी वी टेक्सटाइल चे व्यवस्थापक भूपेंद्र शहाने, वर्धा जिल्हा पत़ंजली योग समितीचे यशवंत कडु, प्रशांत सावरकर, आशिष मुंडे, प्रा खडसे, डॉ नाखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबीरात ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले याशिबीरास कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथील डॉक्टरांची टीमचे विशेष सहकार्य मिळाले. शिबीराचे प्रास्ताविक पतंजली योग समितीचे प्रभारी वसंत पाल यांनी तर संचालन संजय अवचट यांनी करुन आभार रविप्रकाश भालेकर यांनी मानले. शिबीराकरीता पंतजली योग समिती हिंगणघाटचे प्रभारी वसंत पाल, कार्याध्यक्ष योगेश सुंकटवार,सचिव संजय अवचट, प्रमोद भाईमारे, विनीत श्रीवास, दत्तु भोमले, रामानंद चौधरी, गोपाल मांडवकर, आयुष हावगे, वैभव निनावे, अनिल राजपांडे, विजय धात्रक, पोर्णिमा धात्रक, माधुरी शिवनकर, विद्या पेंडके, माधुरी कडु, विठ्ठलराव बोधे, पुरणलाल जैस्वाल, संजय झाडे, लक्ष्मण तेजणे, रामा सुपारे, दामोदर हिवरकर, सुभाष ठाकरे, नरेश बुल्ले, रविप्रकाश भालेकर , प्रभाकर कोळसे आदींनी सहकार्य कले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here