

मोहन सुरकार
सिंदी (रेल्वे) : विदर्भ राज्य आघाडीचे तालुका प्रमुख रामकिशोर शिंगणधुपे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आणि १५ वर्षाने दहेगावा (गोसावी) येथे मंगळवारी (ता.१९)सकाळी ७:३० वाजता वर्धा डेपोच्या लालपरीचे आगमन झाले असता ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला.
दहेगाव (गोसावी) यालाच तुळजापूर रेल्वे या नावाने सुध्दा ओळखले जाते या गावात फार पुर्वी पासुन रेल्वे स्टेशन आहे आणि आता काही वर्षा अगोदर सिंदी पोलिस ठाण्यातुन वेगळे करित येथे स्वतंत्र पोलिसठाणे अस्तित्वात आले आहे. मात्र आतील गाव असल्याने दळणवळणासाठी येथील ग्रामस्थांना फार त्रास आणि आर्थिक दृष्ट्या अडचणीचा सामनान करावाव लागत होता. विशेष म्हणजे दररोज सकाळी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि कामासाठी गावाबाहेर शहरात जाणार्याना फारच अडचणीचे होते शिवाय मागील वर्षभर्यापासुन रेल्वे बंद असल्याने हा त्रास कमालीचा वाढला होतो. परिणामी विदर्भ राज्य आघाडीचे तालुका प्रमुख रामकिशोर शिंगणधुपे यांनी ही समस्या हेरली आणि सतत पाठपुरावा केला. यासाठी असंख्य वेळा त्यांनी एसटी महामंडळाच्या कार्यालयाचे उंबरठा झिझविला.
त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत मंगळवारी ता. १९ पंधरा वर्षांपासून बंद पडलेली बससेवा लालपरीच्या आगमनाने पुर्वत सुरु झाली.
याकरीता महामंडळाचे पिसे साहेब, पल्लवी मॅडम, पोले साहेब यांचे आभार व्यक्त करण्यात आले. लालपरी आगमनाप्रसंगी बस गाडीचे पुजन करुन चालक आणि वाहकाचा नारळ आणि दुप्पटा देऊन सन्मान करण्यात आला. सोबतच मिठाई वाटुन सर्वानी आनंद साजरा केला.
यावेळी अमोल ढाकने, शुभम काटोले, संकेत चावरे, स्वप्निल ठाकरे, समीर आंबाडोळे, मारोती आंबाडोळे, गजानन माने, सदाशिव मात्रे, दिलीप ठाकरे, शरद चाफले, दिलीप बेहेरे, सतिश इंगळे, शेषराव राऊत, राजेश मात्रे, देवा जांभुळकर, राजु ठाकरे, बादल लाडवन अरुन तिवाडे, अशोक आंबाडोळे, सतिश तिजारे, नरेश तिजारे, योगेश राऊत, विलास राणा, कवडु भुते, निलेश बांगडे, प्रशांत येले, अनिल नेहारे, आशिष मोरवाल आदीची तसेच विद्यार्थी, गावकर्यांची मोठी उपस्थिती होती.