दारूसाठी पैसे न दिल्याने व्यक्तीस लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण! आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने व्यक्‍तीला जबर मारहाण करून त्याच्या पायावर दगडाने मारहाण करीत गंभीर जखमी केले. ही घटना २८ रोजी रात्रीच्या सुमारास गजानन नगर परिसरात घडली असून याप्रकरणी २९ रोजी तक्रार दाखल करण्यात आली.

उमेश सुधाकर भुरे हा मित्र ब्रिजेश पांडे याच्यासोबत खर्रा आणण्यासाठी जात असताना आरोपी अतुल मुंगले याने रस्त्यात अडवून उमेशला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. उमेशने पैसे देण्यास नकार दिला असता संतापलेल्या अतुलने रागाच्या भरात उमेशला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून त्याच्या उजव्या पायावर दगडाने मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here