मालवाहूची कारला धडक! चौघे गंभीर जखमी; तक्रार दाखल

वर्धा : चार चाकी वाहनाला मालवाहू वाहनाने समोरून दिलेल्या धडकेत चार चाकीतील चौघांना गंभीर जखमा झाल्या. हा अपघात बांगडापूर ते कन्नमवार रस्त्यावर झाला. साहेबराव वैद्य, अरुण धुर्वे, शशिकला साठे, आरती परतेती हे चार चाकी वाहनाने कन्नमवारकडून बांगडापूरकडे जात होते.

दरम्यान, समोरून भरधाव आलेल्या एम.एच. २९ टी, ४४६१ क्रमांकाच्या मालवाहू चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून चार चाकीला समोरून धडक दिली. यात कारमधील चौघांना गंभीर मार लागला. दरम्यान, मालवाहू चालकाने घटनास्थळाह्न पळ काढला. साहेबराव वैद्य यांनी तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here