तरुणाची विहिरीत उडी घेत आत्महत्या

समुद्रपूर : येथील भालकर वॉर्ड भागातील तुषार गजानन आडकिने (वय २२) याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. २०) सायंकाळी उशिरा उघडकीस आली.

तुषार हा घरून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोधमोहीम राबविली; पण, तो न सापडल्याने अखेर समुद्रपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. शिवाय शोधमोहीम पुन्हा नव्या जोमाने राबविण्यात आली. दरम्यान, ओमकार ले आऊट मध्ये तुषारची गाडी आढळली. त्यानंतर बारकाईने पाहणी केली असता लीला चाटे यांच्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच समुद्रपूर पोलीस ठाण्याचे नीलेश पेटकर, अजय वानखेडे यांनी घटनास्थळ गाठून नागरिकांच्या मदतीने तृषारचा मृतदेह विहिरीबाहेर काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here