सण उत्सवाच्या काळात मिठाई उत्पादक व विक्रेत्यांनी दक्षता घ्यावी! अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

वर्धा : सणासुदीच्या काळात नागरिकांडून खवा, मावा, मैदा, आटा, खादयतेल, वनस्पती यासारख्या मिठाई व इतर अन्न पदार्थाची मोठया प्रमाणात मागणी करण्यात येते. त्यामुळे मिठाई उत्पादक व विक्रेत आणि इतर अन्न व्यवसायिकांनी मालाची विक्री करतांना दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) जयंत वाने यांनी केले आहे.

दुकानदारांनी दुकानाचा परीसर हा पर्यावरणीय दृष्टीने व किटकापासुन सरंक्षित असावा, कच्चे अन्न पदार्थ परवानाधाक, नोंदणीधारक व्यावसायिकांकडूनच खरेदी करण्यात यावेत. त्यांची बिले सांभाळून ठेवावीत तसेच ग्राहकांनी उघडयावरील पदार्थ खरेदी करु नये. खव्यापासुन तयार केलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो 24 तासाच्या आत करावे, मिठाईची चव किंवा गंधात फरक जाणवल्यास ती नष्ट करावी, अन्न पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, तयार अन्न पदार्थ हे स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच व्यवस्थीत झाकुन ठेवावेत.

आजारी व्यक्तीने अन्न पदार्थ हातुळु नये. मिठाई तयार करताना केवळ फुडग्रेड खाद्यरंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा.(100 पीपीएम पेक्षा कमी) मिठाई ट्रे वर दर्शनी भागात वापरण्यायोग्य दिनांक टाकावा, बंगाली मिठाई ही 24 तासांच्या आत खण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत. मिठाई बनविताना तसेच हाताळाण्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी, मास्क हातमोजे व स्वच्छ ॲप्रॉन वापरावे, मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योगय दर्जाचे व उच्च प्रतीचे असावे, मिठाई हाताळतांना हात वारंवार स्वच्छ धुवावे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

अशा सूचना मिठाई उत्पादक, विक्रेते व इतर अन्न व्यावसायिकांना देण्यात आल्या असुन या काळात मिठाई व इतर अन्न पदार्थाच्या सेवनामुळे विषबाधासारखी अप्रिय घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच अन्नपदार्थ व मिठाई विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2009 मधील तरतुदी भंग केल्याचे आढळल्यास त्याच्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल असेही आवाहन त्यांनी केले.

अन्न पदार्थ व मिठाई विक्रेत्यांनी अन्न पदार्थात भेसळ किंवा फसवणुक केल्याचे आढळल्यास ग्राहकांनी प्रशासनाच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर किंवा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या 07152-243078 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे अन्न व औषध प्रशासन विभागाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here