पोलीस पाटलावर चाकू हल्ला! आरोपी अल्ताफवर विरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : दारूविक्री न करण्यासाठी समजूत घालण्यास गेलेल्या पोलीस पाटलावर दारूविक्रेत्याने चाकूने वार केले. ही घटना २९ रोजी धामणगाव वाठोडा गावात घडली. याप्रकरणी रात्री उशिरा सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कमलाकर श्रावण नेहारे (४७) असे जखमी पोलीस पाटलाचे नाव आहे. अल्ताफ शेख असे दारूविक्रेत्याचे नाव असून त्याला गावकऱ्यांनी चोप दिल्याने सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांनी सांगितले.

अल्ताफ शेख हा गावात दारूविक्री करतो. महिला मंडळाने त्याची दारू ‘पकडल्याने पोलीस पाटील कमलाकर नेहारे, तंटामुक्‍त अध्यक्ष गजानन इमडवार, शांता मोहिते हे काही गावकऱ्यांसह अल्ताफला समजावयास त्याच्या घरी गेले होते. यावेळी त्याने पोलीस पाटील नेहारे यांच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने वार केले. तसेच सोबत असलेल्या गजानन इमडवार यांनाही जखमी केले. गावकऱ्यांनी अल्ताफ याला पकडून चांगलाच चोप दिल्याने तो जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अल्ताफवर विरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here