सिलिंडरच्या गॅस गळतीमुळे पिपरी ‘खराबे’ येथे घराला लागली आग! तीन शेळ्यांसह कापूस विक्रीतून मिळालेली रोख व दागिणे कोळसा

आगरगाव : घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे घराला आग लागली. या घटनेत तीन शेळ्या तसेच घरातील रोख आणि दागिने जळून कोळसा झाला. ही घटना बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. पिपरी (खराबे) येथील दिनेश पंधरे यांच्या घरातील घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेमुळे या कुटुंबावर संकटाचा डोंगरच कोसळला आहे.

आगरगांव गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पिपरी (खराबे) येथे नागरिकांची दिनचर्येतील कामे सुरळीत सुरू असताना घरात गॅस सिलिंडर लिक झाल्याने आग लागली. पाहता-पाहता आगीने संपूर्ण घर आपल्या कवेत घेतले, आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटना स्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा केला. शिवाय अग्निशन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठुन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पण या आगीत दोन ते तीन दिवसांपूर्वी कापूस विक्री करून प्राप्त झालेली रोख रक्‍कम, घरात बांधून असलेल्या तीन शेळ्या, घरातील दागिने जळून खाक झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here