विवाहितेचा छळ! चौघांवर गुन्हा दाखल

देवळी : विवाहितेचा मानसिक छळ करून मारहाण केल्याप्रकरणी देवळी पोलिसात पतीसह तिघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आला आहे. विवाहितेचे लग्न संजय मधुकर फटिंग याच्याशी झाले होते. मात्र, लग्नानंतर पती संजय विनाकारण वाद करून विवाहितेस शिवीगाळ करीत तिचा मानसिक छळ करायचा. याबाबत महिला तक्रार निवारण केंद्रात प्रकरण दाखल झाले असता समझोता झाला. मात्र, त्यानंतरही पती संजय फटिंग, जनाबाई फटिंग, गजानन फटिंग, वंदना फटिंग हे विवाहितेला घरगुती वादातून त्रास देत तिचा मानसिक छळ करायचे. अखेर त्रासाला कंटाळून विवाहितेने तक्रार देवळी पोलिसात दाखल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here