

वर्धा : पिपरी (मेघे) परिसरात असलेल्या वॉर्ड 3 मधील जुन्या वस्तीतील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक विहिरीवर नागरिकांनी अनधिकृतपणे मोटारपंप लावून बेसुमार पाण्याचा उपसा करीत आहे. काही महिला दोर-बादलीने पाणी काढत असल्याने त्यांना विजेचा झटका लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने अनधिकृत मोटारी काढण्यात याव्यात, अशी मामणी अमर दांदडे यांच्यासह नागरिकांनी पिपरी सरपंचांना निवेदनातून केली आहे.
जुन्या वस्तीत असलेल्या सार्वजनिक विहिरीवरून मोटारपंप लावून पाण्याचा उपसा सुरू आहे. मात्र, विहिरीवर लागून असलेले तार, वायर यांमुळे नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता आहे. पिपरी गावात हातपंप, जीवन प्राधिकरण तसेच नळयोजना आहे. नळाद्वारे गावात पाण्याची सुविधादेखील आहे. मात्र, खुलेआम वीजतारांमध्ये नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनधिक्रत मोटारपंप विहिरीतून काढण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.