गळा आवळून पत्नीची हत्या! आरोपी पतीला अटक

समुद्रपूर : घरात पत्नीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आवळून आल्यानंतर पतीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, पोलिस तपासात पतीनेच पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून १८ नोव्हेंबर रोजी उघडकीस आला आहे. त्यानंतर मोठ्या क्रूरतेने पत्नीचा खून करणाऱ्या पतीस पोलिसांनी अटक केली.

तालुक्‍यातील कांढळी गावातील ही घटना असून सिंदी रेल्वे पोलिसात नोंद आहे. आरोपी भारत लक्ष्मण पुसनाके (५५) रा. कांडळी ता. समुद्रपूर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली. २ नोव्हेंबर रोजी मंदा भारत पुसनाके (४५) हिचा कुजलेलेल्या अवस्थेतील मृतदेह तिच्या राहते घरी कांढळी येथे मिळून आला. त्यावरून सिंदी (रेल्वे) पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी मृतदेहाची पाहणी केली असता घातपाताचा संशय बळावल्याने पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सदर घटनेचा सखोल व समांतर तपास स.पो.नि महेंद्र इंगळे व पो. उपनि.सौरभ घरडे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात पथकाने केला.

३० ऑक्टोबर रोजी पत्नी मंदा व तिचा पती भारत यांच्यात वाद होऊन जोरदार भांडण झाले होते. तिचा पती हा घटनेपासूनच गावात दिसत नव्हता. या संशयावरून वायफळ बेडा, पालोती, केळझर येथे शोध घेत असता भारत पुसनाके हा हरदोळी ता. आर्वी शेतशिवारात असल्याची माहिती मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here