उमेदमुळे ग्रामीण महिलांमध्ये यशस्वी होण्याचा विश्वास निर्माण झाला : सरिता गाखरे

वर्धा : जिल्हयामध्ये उमेदचे काम वाखानन्यासारखे आहे. जिल्ह्यात महिलांचे सक्षमीकरण योग्यरित्या होत असून घराचे मुख्य चाक म्हणुन काम करणारी महिला आज विविध क्षेत्रात अग्रगण्य आहे. आज महिला विविध क्षेत्र पादाक्रांत करीत आहे. उमेदमुळे ग्रामीण महिलांमध्ये एक यशस्वी होण्याचा विश्वास निर्माण झालेला आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाजीविका अभियान दि.8 मार्च ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ व मुद्रा योजना प्रचार प्रसारचा शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा परिषद सदस्य नुतन राऊत, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक वैभव लहाने, जिल्हा अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिला सक्षम होत असतांना स्त्री आणि पुरुष असा दोघांचा सहभाग असल्यास महिलांची प्रगती होत असते. आज महिलांनी केवळ घर या संकल्पनेतून निघून एक स्वत:ची प्रतिमा तयार केली आहे. आज कुठल्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. शासनाच्या महिलांकरीता असणा-या विविध योजनेचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी यावेळी केले.

तत्पुवी मान्यवरांचे हस्ते उत्कृष्ट ग्रामसंघ नवज्योती ग्रामसंघ काजळी, उत्कृष्ठ सावित्रीबाई फुले प्रभागसंघ, प्रज्ञा महिला उत्पादक बोरगाव, शारदा उत्पादक गट धानोरा, राष्ट्रीय प्रशिक्षक अरुणा बहादूरे, सविता बनकर, उत्कृष्ठ समुह उद्योग तेजस्विनी सोलर कंपनी कवठा झोपडी, महिला उद्योजक रीना गाडेकर, प्रिया देवळीकर, उत्कृष्ठ यशोगाथा संगिता पिसुड्डे तसेच उत्कृष्ठ बँकर्स आतिश रघाटाटे, मिलींद नागदिवे, आशिष निमकरडे, मिलींद गवळी, सचिन भगत, रंजना चोपडे, चेतन वंजारी, वैशाली राऊत, बोथलीकर, मंगेश कासार, हरीओम, प्रशांत वंजारी, उज्वल बोध्याय अशा विविध बँकेच्या बँकर्सना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

जिल्हयात ग्राम विकास मंत्रालय यांच्या अंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन, दिनदयाल उपाध्याय कौशल्य योजना, नाविन्यपूर्ण योजना इत्यादी योजनेतून महिलांना लाभ मिळवून देण्यात येत आहे.

जिल्हयात एकुण 14 हजार 261 गट असून 1 लाख 56 हजार 567 कुंटूंबाचा सहभाग आहे. यामध्ये 952 ग्रामसंघ, 49 प्रभागसंघ, 1 हजार 200 उत्पादकसंघ, 4 उद्योग विकास केंद्र, 7 शेतकरी उत्पादक कंपनी निर्माण केली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास सिद यांनी केले तर संचालन सरिता इंगोले व आभार मनिष कावळे यांनी मानले. कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या महिला मोठया संख्येन उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here