वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल! नालवाडी येथील घटना

वर्धा : घरासमोरील वीजतारांवर वायर टाकून वीजचोरी केल्याप्रकरणी शहर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. नालवाडी येथील नागसेन नगर परिसरात ही घटना घडली.

वीजचोरी पकड मोहिमेअंतर्गत नागसेननगर परिसरात पाहणी केली असता वर्षा मनोज बागडे यांच्या घरासमोरील वीजवाहिनीवर हूक टाकून वीज चोरी होत असल्याचे दिसून आले. दरम्यान हूकसाठी वापरण्यात येणारा वायर जप्त करुन वीज चोरी केल्याप्रकरणी त्यांना ७३४० रुपयांचे देयक आकारण्यात आले. त्यांनी सदर देयक न भरल्याने त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसात सहाय्यक अभियंता विलास महाल्ले यांनी तक्रार दिली. सध्या वीजचोरी पकडण्यासाठी मोहिम राबविली जात आहे. वीज चोरी करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here