सिलिंडरच्या भडक्यात स्वयंपाकघर खाक! मांडगाव येथिल घटना

समुद्रपूर : गॅसवर पाणी गरम करण्यासाठी गॅस सिलेंडर सुरु करताच अचानक सिलेंडरचा भडका उडाल्याने स्वंयपाक घर जळून खाक झाले. ही घटना सोमवार, 15 नोव्हेंबर रोजी मांडगाव येथे घडली.

मांडगाव येथील रामकृष्णा तिमांडे यांच्या पत्नी मंगला तिमांडे या आयुर्वेदिक औषधे घेण्यासाठी स्वंयपाक घरात गॅसवर पाणी गरम करीत असतांना सिलेंडरने अचानक पेट घेतला. त्यावेळी घरातील सर्व सदस्यानी पळ काढला. त्यामुळे पुढील जिवीतहानी टळली. त्यानंतर घरच्या मंडळींनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर आग काही प्रमाणात आटोक्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here