

वर्धा : नाश्त्यासोबत मिरची, कांदा मागितल्याने संतापलेल्या हॉटेल मालकाने लाथाबुक्क्यांनी तसेच कांदे कापण्याच्या चाकूने मारहाण करीत जखमी केले. येळाकेळी येथे ही घटना घडली.
सुरेश पांडुरंग पिंपळे हे रवी बाबाराव सुरदूसे यांच्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांनी नाश्त्यासह कांदा, मिरची हॉटेल मालकाला मागितली असता रवीने सुरेशशी वाद घालत लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर कांदे कापण्याच्या चाकूने हनुवटीवर मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.