अल्पवयीन मुलीस गर्भधारणा! आरोपीस ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा

वर्धा : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गर्भवती करणाऱ्या आरोपीस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही.टी.सुर्यवंशी यांनी हा निकाल दिला.

वैभव गजानन टेकाम (२२) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पिडिता अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही त्याने तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करुन तिला लग्नाचे आमिष दिले. यातून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याने ती आठ महिन्याची गर्भवती राहिली. आधी लग्नाचा विश्वास देणार्‍या आरोपीने पिडिता गर्भवती असल्याचे लक्षात येताच ‘हे मुल माझे नाही, याच्याशी माझा काहीही संबंध नाही’ असे सांगून गर्भपात करण्याचा आग्रह धरला. पण, पिडितेने नकार दिल्याने आरोपी वैभव याने तिला जबर मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे पिडिता वडिलांकडे राहायला आली. माहेरी असताना २ फेब्रुवारी २०२० मध्ये तीने मुलाला जन्म दिला. याप्रकरणी पिडितेने सेवाग्राम पोलिसांत आरोपी वैभव टेकाम विरुद्ध तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक दीपक वानखेडे यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील विनय आर. घुडे यांनी कामकाज पाहिले.

याप्रकरणी अठ साक्षिदार तपासून दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही.टीसुर्यवंशी यांनी आरोपीस १० वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार रुपयांचा दंड. दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक दिगांबर गांजरे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here