ट्रकच्या धडकेत कारचे नुकसान! पवनार येथील धाम पुलाजवळची घटना

पवनार : भरधाव वेगाने नागपुरकडून वर्ध्याकडे जानार्या ट्रक सामोर अचाणक कार आल्याने या कारला ट्रकची धडक बसली यात कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना पवनार येथील धाम नदी पुलावर बुधवार (ता. ८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. मात्र यात कारमधील कुणीही जखमी झाले नाही.

नागपुरकडून भरधाव वेगात ट्रक क्रमांक एमएच १७ ऐजी ९३४० वर्ध्याकडे जात होता दरम्यान त्याच बाजूने कारही वर्ध्याकडे जात होती मात्र अचाणक कार मधात आल्याने ट्रक चालकाने ट्रकचे ब्रेक दाबला यात कार क्रमांक एमएच ४९ ऐएस २८३२ धडक बसल्याने ती रस्त्यालगतच्या डिव्हायडरला धडकली यात कारचे मोठे नुकसान साले मात्र कुणीही जखमी झाले नाही. या घटणेची माहिती सेवाग्राम पोलिसांना देण्यात आली असून बातमी हिलत पर्यंत पोलिस घटनास्थळी आलेले नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here