3 वाहनांची धडक! निवृत्त पीआय मृत्युमुखी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : नागपूर-यवतमाळ मार्गावर सेळसुराजवळ तीन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, हा अपघात बुधवारी सकाळी 11 वाजता शेतीशाळेजवळ घडला. यात इतर दोन वाहनांचे चालकही जखमी झाले आहेत. सुधाकर कालू चव्हाण (वय 61) असे मृत पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.

तर ट्कचालक राजनांदगाव रहिवासी रामेश्‍वर व मेटॅडोरचा चालक अंकुश केणी हे जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच सावंगीचे ठाणेदार धनाजी जळक, पीएसआय मल्हारी टालीकोटे हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले. सस्त्यावरून अपघातग्रस्त वाहने हटविण्यात आली. या प्रकरणात मेटॅडोर चालकाविरुद्ध सावंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here