अखेर जिल्हा परिषदेत पत्रकारांवर गदा आणनारा ठराव रद्द! जिल्हा परिषद सदस्य राणा रणनवरे यांचा पुढाकार


वर्धा : जिल्हा परिषदेने पत्रकारावर गदा आणणारा ठराव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मागे घ्यावा अन्यथा पत्रकार संघटनेच्या वतीने भाजपच्या बातम्या प्रसिद्ध करण्यावर बहिष्कार टाकण्यात येईल अशा इशारा पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने देण्यात आला आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत ठराव रद्द करण्यात आला आहे.

आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा परिषद सदस्य राणा रणनवरे यांनी पत्रकार अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने घेतलेला ठराव यामुळे पत्रकारांच्या भावना दुखावल्या आहे तसेच पत्रकारांनी ठराव मागे घेण्याची मागणी केल्याने तो ठराव मागे घ्यावा अशी सूचना केली त्या सूचनेला सभेने मंजुरी देऊन ठराव मागे घेण्याचे सर्वानुमते ठराव घेतला .यामुळे पत्रकार सरक्षण समितीने सभागृहाचे अभिनंदन केले.

वर्धा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दि. २४ डिसेंबर २०२० रोजी भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नितीन मडावी यांनी पत्रकारांवर गदा आणणारा ठराव पारीत करण्यात आला होता. या ठरावाच्या अनुषगाने मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबसे यांनी अध्यादेश काढून जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींना देण्यात आला होता.

जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात कोणत्याही वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाल्यास जिल्हा
परिषदेच्या वकिलामार्फत खटला चालविण्यात येणार असल्याचे ठराव नमुद केले होते. त्यामुळे जिल्हास्तरावरील आणि ग्रामीण भागातील पत्रकारांवर आकसापोटी खटला चालविण्याची दाट शक्यता होती.

पत्रकारांवर गदा आणणारा ठराव त्वरीत रद्द करावा, या बाबत जिल्हाभरातील पत्रकारांनी निवेदन देवून मागणी करण्यात आली होती तरीही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने याबाबत कुठलेही दखल न घेतल्याने तो ठराव रद्द केला नव्हता त्यामुळे पत्रकार संघटनेच्या वतीने भाजपाच्या विविध कार्यक्रमास तसेच प्रसिद्धपत्रक प्रकाशित न करण्याचा बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा निवेदनद्वारे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे याना देण्यात आला होता. परिणामी आज हा ठराव रद्द करण्यात आला आहे.

हा ठराव मागे घेतल्याबाबत पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष रविराज घुमे, सह कार्याध्यक्ष सत्तार शेख, नरेंद्र देशमुख, जिल्हा सचिव योगेश कांबळे, सह जिल्हा कमिटी आणि तालुका कमिटीने अभिननंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here