

हिंगणघाट : २ ऑक्टोम्बर महात्मा गांधी जयंती निमित्ताने संविधान जागृती अभियान, विदर्भ विकास आघाडी आणि वीरा स्पोर्टिंग क्लब यांचे संयुक्त विद्यमाने आत्मक्लेश आंदोलन नंदोरी चौक हिंगणघाट येथे घेण्यात आले.
गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र मिळविण्याकरिता भारतीय हुतात्म्यांना १५० वर्षाचा काळ लागला. एवढ्या प्रदीर्घ काळ आणि अनेक स्वातंत्रवीरांच्या बलिदानानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याला आम्ही मात्र अबादीत ठेऊ शकलो नाही. आज भारताची अवस्था बघितली तर सामान्य जनतेचे स्वातंत्र राजकीय नेत्यांनी हिरवलेले आहे. असे दिसून येत आहे. आज जे सरकर सत्तेत आहे ते सर्वसामान्य जनतेचे सरकार नसून अदानी- अंबानीचे सरकार आहे असे म्हणावे लागते.
बापू आपल्या संघर्षातून मिळालेले स्वातंत्र, नाकर्ते राजकारण्यांमुळे पुन्हा गुलामगिरीच्या विळख्यात खाजगी बँकेचे स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयीकरण झाले. हे सरकार राष्ट्रीयकृत बँकांचे खाजगीकरण करत आहे. धन- दांडग्यांना परदेशी विद्यापीठात उच्च कोटीचे शिक्षण गोर- गरिबांकरिता बलुतेदारी, बेरोजगारी वाढविणारे व संधी नाकारणारे शैक्षणिक धोरण, गुलामगिरीचा कायदा नव्याने पारित बापूंनी दिलेले स्वातंत्र, सरकारने उद्योगपतींच्या हवाली केले. गोरगरीब व शेतकऱ्यांची मुलं आत्मनिर्भर बनणार सरकार अदानी-अंबानीचाच विकास करणार, शेतकऱ्यांच्या लुटीची नवी व्यवस्था, शेतकऱ्यांवर आपत्ती, अंबानीला मात्र संधी अशी व्यवस्था निर्माण केलील जात आहे.
सरकारच्या आशीर्वादाने अंबानीची कमाई दर तासाला ९० लाखाची सर्वसामान्य जनतेच्या आरबीआयचा राखीव निधी अदानी-अंबाणीच्या घशात एल.आय. सी. भारतीय रेल्वे विकले आहे.
केंद्र सरकारने नुकतेच कृषी बिल पास केले त्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा सभागृहात झाली नाही. शेतकऱ्यांना अगोदर छोटे व्यापारी लुटत होते आता नवीन कायद्यानुसार शेतकऱ्यांना मोठे व्यापारी सुद्धा लुटू शकेल अशी व्यवस्था या सरकारने निर्माण केलेली आहे. कामगारांच्या संदर्भात सुद्धा हे सरकार उदासीन झालेले दिसून येते. कामगारांचे हक्क सुद्धा या सरकारने हिरावून घेतलेले आहे. शैक्षणिक धोरण २०१९ यामध्ये गरिबांना वेगळे शिक्षण आणि श्रीमंतांना वेगळे शिक्षण अशी व्यवस्था केलेली आहे. अश्या या निष्क्रिय सरकारचा निषेध म्हणून गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन करून सरकारला जागे करणे आणि गांधीजींनी मिळवून दिलेले स्वतंत्र हे फक्त राजकण्यांकरीता नसून भारतामध्ये वास्तव्य करणाऱ्या १३० कोटी जनतेकरिता आहे. हे या माध्यमातून सरकारला सांगायचे आहे.
भारतातील १३० कोटी जनतेचे स्वतंत्र कोणीही हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा याचे परिणाम राज्यकर्त्यांना भोगावे लागेल. असा इशारा या आंदोलनातून अनिल जवादे यांनी दिलेला आहे. या आंदोलनात दिनेश वाघ, महेश माकडे, जयंत धोटे, दिलीप देवतळे, गोपाल मांडवकर, अजय मुळे, गोकुल पाटील, रामू सोगे, पंकज ठाकरे, प्रशांत भटकर, रोहित राऊत, दिलीप पाटील, बाळूभाऊ शिंगरू, सतीश गिरडे, विलास भोमले व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.