उपजिल्हा रुग्णालयावर युवक कॉग्रेसची धडक! लवकरात लवकर डॉक्टरची नेमणूक करण्याची मागणी

हिंगणघाट : येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील एक महिन्यापासून स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने प्रसूतीसाठी खेड्या पाड्यातून येणाऱ्या महिलांची गैरसोय होत आहे. त्यांना सेवाग्राम किंवा सावंगी मेघे रुग्णालयात जाण्याचा सल्ला रुग्णालायकडून देण्यात येते. प्रत्येक व्यक्तीला तिथे जाऊन उपचार घेणे शक्य नसते त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयातच उपचार व्हायला पाहिजे याकरीता लवकरात लवकर डॉक्टरची नेमणूक करावी अशी मागणी यूवक कॉग्रेसच्या वतिने करण्यात आली आहे.

३१ ऑगस्ट पर्यन्त डॉ. मुंडे या पदावर कार्यरत होते ते पण कंत्राटी पदावर होते, त्यांचा पगारही नियमीत होत नव्हता एवढ मोठ रुग्णालय असून या ठिकाणी कायमस्वरूपी स्त्रीरोगतज्ञ का नियुक्त केला जात नाही हाच प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
तसेच रुग्णालयात बालरोगतज्ञ, सोनोलॉजीस्ट, बधीरीकरण तज्ञ आणि सर्जन यांची हि नियुक्ती केलेली नाही. रुग्णांना जेव्हा डॉक्टरची गरज असते तेव्हा डॉक्टर्स हजार राहत नाहीत म्हणून रुग्णांना उपचारासाठी इतरत्र पाठविले जाते. त्यामुळे त्यांना त्रास तर सहन करावा लागतोच पण यात त्यांची प्रकृती खालावण्याची भीती निर्माण होते.
हे सर्व विषय घेऊन आज जिल्हा उपाध्यक्ष अमित चाफले यांचा नेतृत्वात युवक कॉग्रेस हिंगणघाट विधानसभेच्या पदाधीकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे जाऊन डॉक्टर चाचेरकर यांची भेट घेऊन हे सर्व विषय त्यांच्या समोर मांडले व लवकरात लवकर डॉक्टरची नेमणूक करावी अशी मागणी केली.
या संबंधीची माहिती पालकमंत्र्यांना देण्याकरिता युवक कॉंग्रेस हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ वर्धा येथे पालक मंत्र्यांची भेट घेतली.
यावेळी हिंगणघाट विधानसभा उपाध्यक्ष पंकज पाके, महासचिव श्रीकांत देवलपल्लीवार, सचिव शैलेश मैन्द, हिंगणघाट शहर अध्यक्ष अंकुशदादा कुचनवार, उपाध्यक्ष करनसिंग भादा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here