मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

वर्धा : स्वावलंबी शाळेजवळील संकट मोचन हनुमान मंदिर येथील दानपेटीचे कुलूप तोडून त्यामधील चिल्लर व नोटा एकूण वीस हजार रुपयाचा माल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला याबाबद फिर्यादी चंद्रशेखर मारोतराव राऊत, रा. रामनगर, यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलीस स्टेशन रामनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखा वर्धा सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना मुखबिरकडून प्राप्त माहितीवरून श्रावण कृष्णाजी खाकरे याचा त्याचे पुलगाव येथील घरी शोध घेतला असता तो घटना तारखेपासून पुलगाव येथून निघून गेलेला होता त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले असता सदर आरोपी याने संकट मोचन हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील पैसे चोरून नेल्याचे कबूल केले आरोपीचे घरझडतीतुन चोरीचे रुपये हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला.

सदर आरोपी याने मगिल १३ वर्षा दरम्यान अमरावती, नागपुर, चंद्रपुर वर्धा परिसरात अनेक मंदिरातील घंटा, देवावरील दागिने, दानपेटी मधील पैसे चोरी केलेले असुन त्याचे विरुद्ध अनेक गुन्हे नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने आरोपीस गुन्ह्यात अटक करून पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन रामनगर यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक वर्धा, प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांचे मार्गदर्शनात निलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे निर्देशनात करण्यात आली. संतोष दरगुडे, गजानन लामसे, हमीद शेख, नापोशी. चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवस्कर, मनीष कांबळे, गोपाल बावनकर, पोशी जयसिंगपुरे, प्रदीप वाघ, नवनाथ मुंडे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here