ट्रकच्या धडकेत युवा कामगाराचा जागीच मृत्यू! चालकाने ट्रक सोडून काढला पळ; वणी येथील गिमा टेक्सटाइल जवळील घटना

वर्धा : गिमा टेक्सटाइलमध्ये कामाला पायदळ जात असलेला कामगाराला भरधाव येणार्या ट्रकने धडक दिलील यात युवकाचा जागीच मृत्यू झाला. आकाश मोरेश्वर मुन वय २८ वर्ष राहणार हिंगणघाट असे मृत यूवकाचे नाव आहे. शहरातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरील वणी येथील गिमा टेक्सटाइल जवळ आज गुरुवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हाह अपघात घडला.

हैदराबाद कडून नागपूरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रक क्रमांक UP 94 T6194 अनियंत्रीत होत यूवकाला धडक दिली. यावेळी ट्रक चालकाने आकाशला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात ट्रक पलटी झाला. अपघात होताच ट्रक चालकाने ट्रक सोडून पळ काढला.

अपघाताची माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. व अपघातग्रस्त ट्रकला जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघाता संबंधी अज्ञात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here