आमदार केचे यांचे बैठकीत निर्देश! घरांचे बांधकाम नियमित करा

आर्वी : वागदा बाभुळगाव व आर्वी शहरातील विविध वार्डातील अतिक्रमण धारकांचे नियमाकुल करण्यासाठी असलेल्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषद इमारतीत बैठक घेण्यात आली. वागदा गावातील अस्तित्वात असलेले विस कुटुंबांचे कच्चे घरे गेल्या विस वर्षापासून असून यांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत. त्यांना नळ कनेक्शन, विद्युत पुरवठा तसेच नागरी सुविधांसाठी असणारे संलग्न रस्ते असतानाही ग्रामपंचायत सचिव धुर्वे यांनी राजकीय भावनेतून चुकीचा अहवाल शासनदरबारी सादर केल्याबाबत आमदार केचे यांनी त्यांना खडसावत मोलमजूरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या परीस्थितीची जाणीव ठेवत माणुसकीचे पालन करावे, असे आवाहन केले.

देशातील सर्व कुटुंबांना घरे बांधून देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असताना शासनास योजनेसाठी लाभ देण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता प्रशासनाला करावयाची असते. प्रशासनाच्या एका चुकीने संपूर्ण कुटुंबाचे नुकसान होऊ शकते, ज्वलंत उदाहरण वागदा गावात घडले असल्याचे आमदार केचे यांनी म्हटले. धुर्वे यांची सचिवामार्फत कारवाई करून वंचितांना भूखंड कसे देता येईल, या दृष्टिकोनातून विचार करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

अनेक दशकांपासून वास्तव्यास असलेल्या बाभुळगाव येथील नागरिकांची खाजगी मालमत्ता धारकाच्या जमिनीवर असल्याने प्रशासन व जमीन मालकांची बैठक घेऊन निर्णायक तोडगा काढावा, असेही निर्देश दिले. रामदेव बाबा वार्ड, जनता नगर, अहमद नगर, भाईंपूर, महादेव वार्ड, दत्त वार्ड, श्रीराम वार्ड, विठठुल वार्ड भागातील अतिक्रमण धारकांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

यातील काहींचे काम प्रगतीपथावर आहे तर काही ठिकाणी खाजगी मालमत्ता असल्याने वाभुळगाव गावासाठी ठरल्याप्रमाणे धोरण अबलंबविण्याचे निर्देशही आ. केचे यांनी अधिकाऱ्यांना दिले. या प्रसंगी नगरपालिकेचे बांधकाम सभापती कैलास गळहाट, उपविभागीय अधिकारी हरीष धार्मिक, तहसीलदार व्ही. बी. चव्हाण, गटविकास अधिकारी व्ही. बी. मडावी, समीर डांगे, जी. ए. मोने, उपअधीक्षक भी. मो. नान्ने, मुख्याधिकारी विनायक मगर, ग्रामसेविका पी. आर. धुर्वे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आर. आर. जोगी यांच्यासह अतिक्रमणधारक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here