१२०० उचल रक्कमेसह १५ हजार दिवाळी भेट द्या! एसटी कर्मचार्‍यांचे बेमुदत उपोषण

वर्धा : ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देऊन शासकीय नियमाप्रमाणे १२,५०० रुपये उचल रक्‍कम तसेच दिवाळी भेट १५ हजार रुपये दिवाळीपूर्वी देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी संयुक्‍त कृती समिती, वर्धा विभागाच्यावतीने एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर बुधवार २७ ऑक्टोबर रोजी बेमुदत उपोषण करण्यात आले.

राज्य परिवहन महामंडळाकडून कामगारांच्या मान्य केलेल्या अनेक आर्थिक प्रश्‍नांची सोडवणूक होत नसल्याने कामगारांमध्ये आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. कामाचे वेतन वेळेवर न मिळणे व आर्थिक नैराशेपोटी सुमारे २५ कामागारांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. अशा घटना यापूर्वी कधीही घडलेल्या नव्हत्या. एसटी महामंडळाने ३० जून २०१८ मध्ये परिपत्रकीय सूचना काढून मान्य केल्या असतानाही अद्याप वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्‍के व घरभाडे भत्ता दर ८, १६, २४ लागू केलेला नाही, हे अन्यायकारक आहे.

कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचा-यांना लागू होणारा महागाई भत्याचा दर राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना लागू करण्याचे मान्य केले असूनही महागाई भत्याचा दर जुलै २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीची नऊ महिन्यांची ३ टक्के महागाई भत्याची थकबाकी कामगारांना अद्याप मिळालेली नाही. तसेच महागाई भत्ता डिसेंबर २०१९ पासून १२ टक्केवरून १७ टक्के असा लागू करूनही सदर वाढीव ५ टक्के महागाई भत्ता एसटी कर्मचा- यांना लागू करण्यात यावा.

आता राज्य शासनाने १ ऑक्टोबर २०२१1 पासून महागाई भत्याच्या दरामध्ये १७ टक्केवरून 28 टक्के अशी वाढ केली आहे. सदर वाढीव महागाई भत्ता ऑक्टोबर २०२१ च्या वेतनासोबत रोखीने देण्याचे मान्य केळे आहे. शासकीय कर्मचा-यांना आता महागाई भत्याचा दर २८ टक्के लागू केलेला असतानाही एसटी कर्मचा- यांना मात्र, ऑक्टोबर २०१९ पासून ते आतापर्यंत १२ टक्के महागाई भत्ता दिल्या जात आहे. ही बाब एसटी कर्मचा-यांवर अन्याय करणारी असल्याचे म्हटले आहे. आंदोलनात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल माटे, सचिव त्रुणाल वरवबटकर यांच्यासह एसटी महामंडळाचे मोठ्या संख्येने कर्मचारी- कामगार सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here