शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी! गावातील नागरिकांना दिला मदतीचा हात

नंदोरी : जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थौमान घातले आहे. हिंगणघात तालुक्यातील वाघोली केंद्रातील डायगव्हान या छोट्या गावात 33 कुटूंबातील 57 व्यक्ती कोरोना बाधित झाले होते. त्यामुळे 31 मार्च पासून हे गाव बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते.

गावातील सर्व लोक बंदीस्त असल्याने व्यवसाय रोजगार बंद झाला होता. परिणामी गरीब कुटूंबातील नागरीकांचे हाल होत होते. गरजू व्यक्तींना आपल्या माध्यमातून मदत व्हावी याकरीता केंद्रप्रमुख यादव तुराळे, आरोग्य अधिकारी मगर मॅडम, जि.प शाळा डायगव्हान, जामणी, मुख्याध्यापक चंद्रकांत ठाकरे व गजानन भालकर व नवकेतन विद्यालय जामणी चे मु. अ. योगेश्वर कलोडे यांनी एकत्र येत आपाआपल्या शाळेतील सर्व शिक्षकांना मदतीचे आव्हान केले.

शाळेतील सर्व शिक्षकांनी व इतर समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत केली व गावतील 55 कुटूंबातील 230 व्यक्तीना सर्व धान्याची किट चे वाटप करण्यात आले. गावातील नागरिकांना मदतीचा हात दिला. या करिता प.स. हिंगणघाटचे गटशिक्षणाधिकारी अशोक कोडके, श्री टाकळे साहेब यांनी सहकार्य केले. या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तिन्ही शाळेतील शिक्षकांचे सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here