सिंदी प्राथमीक आरोग्य केंद्रात ताबडतोब २० ऑक्सीजन बेड आणि RTPCR चाचणी केंद्र सुरू करा! प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

सिंदी (रेल्वे) : वाढत्या कोविड रुग्ण संख्येने अस्तित्वात असलेल्या कोविड रुग्णालयात उपचाराला बेड जागाच उपलब्ध होणे कठीन झाले अशा परिस्थितीत उपचाराची नविन छोटी छोटी स्वतंत्र व्यवस्था केल्याने सर्वांनाच सोईचे होईल करीता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सिंदी आरोग्य वर्धीनी केंद्रात ताबडतोब विस आॅक्सीजन युक्त बेड आणि RTPCR चाचणी केंद्र सुरू करण्याची मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना तहसीलदार महेंद्र सोनवणे यांच्या व्दारे शुक्रवारी (ता.२३) देण्यात आले.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांच्या नेतृत्वाखाली वर्धा जिल्हा प्रमुख जयंत भाऊ तिजारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी वर्धा यांना तहसीलदार सेलु यांना निवेदन देण्यात आले. सिंदी (रेल्वे) हे शहर नगर परिषदेचे असून जवळपास १४ हजाराच्या वरती लोकसंख्येचे शहर आहे. शहराच्या आजूबाजूने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग आहे.

सध्याची परिस्थिती बघता कोविड रुग्णांना वर्धा, सेलू, सेवाग्राम, सावंगी, हिंगणघाट, नागपूर येथे उपचाराकरिता जावे लागत आहे. काही रुग्णांना बेड मिळत नसल्यामुळे निराश होऊन वापस यावे लागत आहे. सिंदी (रेल्वे) आरोग्यवर्धिनी केंद्र येथे कोविड रुग्णांकरिता 20 बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरची व्यवस्था करण्यात यावी. उपचाराकरिता जाण्यायेण्याचा खर्च, श्रम, वेळ होणारा मनस्ताप टाळता येईल यासोबत डॉक्टर्स ,नर्सचा स्टाप वाढविण्याकरिता व एक चांगल्या प्रकारची रुग्णवाहिका आरोग्यवर्धिनी केंद्राला मिळण्याची मागणी केली.

याबाबत निवेदनातून म जिल्हाधिकारी वर्धा यांना वरील दोन मागण्या करण्यात आल्या निवेदन देतेवेळेस प्रहार जनशक्ती पक्षाचे वर्धा जिल्हा उपप्रमुख मंगलभाऊ सोनटक्के, सेलू तालुका प्रमुख हंसराज बेलखोडे ,शहर प्रमुख सुरज आष्टनकर, उपशहर प्रमुख सचिन पेटकर, शुभम गोल्हर, नूतन बेलखोडे, शुभम सुरकार, अभिषेक बडवाईक, कुणाल सोनटक्के, वैभव मुंडाले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here