दुकानाला आग! साहित्यासह दोन दुचाकी जळाल्या; तीन तासाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण

आर्वी : आर्वी ते देऊरवाडा मार्गावरील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर असलेल्या फर्निचरच्या दुकानाला अचानक आग लागली. यामध्ये दुकानातील फर्निचर, मशीन व दोन दुचाकी जळल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तीन तासांच्या प्रयत्नांती या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

आर्वी ते देऊरवाडा मार्गावर श्रीनाथ लाखे (रा. वाठोडा पुनर्वसन) यांचे फर्निचरचे दुकान आहे. अमरावती येथून आर्वीला परत येताना शनिवारी रात्रीला सामाजिक कार्यकर्ते दर्पण टोकसे व त्यांच्या मित्रांना एका दुकानाला आग लागल्याचे दिसून आले. दर्पण टोकसे यांनी लागलीच पोलिसांना व उपमुख्याधिकारी रंजित पवार यांना आगीची माहिती दिली. याची दखल घेत नगरपालिकेचे अगनिशमन दल घटनास्थळी दाखल झाले. रात्री तीन वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. लाखे यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेले दुकान पूर्णपणे जळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या आरतीत दुकानातील फर्निचर, सागवानाचे लाकूड, मशीनरी आणि दोन दुचाकी जळून राख झाल्या. त्यामुळे त्यांचे अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रणजित पवार, फायरमन शिवा चिमोटे, नरेश आखरे, वाहनचालक कम ऑपरेटर बबन बावनकर, नीलेश गिरडकर, अरुण पंड्या उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here