कुजलेल्या अवस्थेत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह! एकच खळबळ उडाली

तळेगाव : नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील जंगलात अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना सत्याग्रही घाटात उघडकीस आली. या घटनेने उलटसुलट चर्चेला पेव फुटले.

प्राप्त माहितीनुसार, सत्याग्रही घाटात असलेल्या जंगल परिसरात रविवारी सरपण गोळा करणाऱ्या युवकांना सकाळच्या सुमारास ६० ते ६५ वर्षे वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. याची माहिती त्यांनी तळेगाव पोलिसांना दिली.

पोलिसांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनस्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आर्वी येथील ग्रामीण रुग्णायात पाठविला. मृतदेहाची ओळख पटली नव्हती. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकरसह कमर्कचारी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here