

वर्धा : शहरातील आरती चौक येथील बस्थानकात इसमाचा मृत्यूदेह आढळून आल्याची घटना रविवारी (ता. २५) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
माहितीनुसार मुरलीधर लक्ष्मण जुमडे वय अंदाजे ६५ वर्ष रा. नागपूर असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा वर्धा येथे राहत असलेल्या मावसभावाकडे आला असल्याचे सांगण्यात आले. रविवारी सकाळच्या सुमारास आरती चौक येथील बस्थानकात त्याचा मृतदेह आढळून आला.
पोलीसांना मृतकाच्या खिशात माया इटणकर यांचा मोबाईल नंबरची चिट्टी दिसून आली. त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. माया इटणक हे मृतकाची बहीण असल्याची माहिती पोलिसांनी दिली. .