५६ हजारांचा ऑनलाइन गंडा! व्हॉट्सअपवर पाठविला बीएसएनएलच्या नावे मेसेज

वर्धा : तुमचे बीएसएनएलचे सिमकार्ड आज एक्स्पायर होत आहे, असे म्हणून कस्टमर केअर नंबरवर तत्काळ संपर्क साधा, अन्यथा तुमचे सिमकार्ड 24 तासाच्या आता डिऑक्टिव होईल, असा बनावट मेसेज टीम बीएसएनएलच्या नावाने पाठवित फियांदीला ५६ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला.

वर्धा येथील रामनगर भागात राहणारे मधुकर निनाजी राणे (वय ५५) यांच्या मोबाईल व्हॉट्सअपवर केवायसी करण्यासाठी मेसेज पाठविला. सदर मेसेजनंतर फिर्यादीला ऐनी डेस्क हा अँप डाउनलोड करायला लावला. त्यानंतर अँपमध्ये ज्या अटी येतात, त्या स्विकारण्यास सांगितले नंतर एटीएम कार्ड डिटेल्स मागून १० रुपये पाठविण्यास सांगितले. फिर्यादीच्या मोबाईल वरील सर्व माहिती आरोपी हा त्याच्या मोबाईलवर पाहत होता. कारण फिर्यादीचा मोबाईल आरोपीच्या मोबाईलशी ऐनी डेस्क या अँपद्वारे जोडल्या गेला होता.

वरील सर्व माहिती त्याने दुस-या मोबाईलवर कॉल करून सांगितली. त्यानंतर अवघ्या १० मिनिटात त्याने फिर्यादीच्या बँक खात्यातून ४९ हजार रुपये, त्यानंतर ७ हजार रुपये असे एकूण 56 हजार रुपयांचे ट्रान्स्झेक्शन केले. ५६ हजार काढल्याचा मेसेज फिर्यादीला आल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here