

मोहन सुरकार
सिंदी (रेल्वे) : येथील प्रतिष्ठित शेतकरी मधुकर लिखार यांच्या मौजा मारडा शिवारातील गोठ्याला भिषण आग लागल्यान पाच बैलांचा मृत्यू झाला तर गोठा पुर्णपणे जळून खाक झाल्याची घटना मंगळवार (ता. १६) सिंदी (रेल्वे) येथे सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
या आगीत शेतकर्याचे सहा बैल आणि ५० एकर शेती कसण्यासाठी लागणार्या साहित्य व गुरांचे वैरण ठेवता येईल ऐवढा मोठ्या गोठ्याला अचानक आग लागुन साहा बैलापैकी पाच बैल जागीच कोळसा झाले तर पंचवीस तीस गोने हरभर्याचे कुटार सहा बैलाच्या वाहीतीसाठी लागणारे शेती अवजारे, दोर, दावे, जू, वखर, नागर, तिफन आदी असंख्य साहीत्य जळुन अशरक्षः खाक झाले. एक बैल दाव तोडुन पळाला म्हणून वाचला मात्र गंभीर जखमी झाला आहे.