दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू

कारंना (घा.) : भरधाव दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना ठाणेगाव शिवारात घडली. घनश्याम बावनकर व घनऱ्यामची आई सुनीता बावनकर हे दोघे एम.एच. २७ सी.जी. १०८६ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. दुचाकी ठाणेगाव शिवारात आली असता घनश्यामची आई दुचाकीवरून जमिनीवर पडली. यात सुनीता हिचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद कारंजा पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here