कार व दुचाकी अपघातात दोघे गंभीर जखमी! कारचे मोठे नुकसान

तळेगाव (श्या.पंत.) : तळेगाव वरून सारवाडीच्या दिशेने जात असलेली दुचाकी कारला मागाहून धडकल्याने अपघात झाला. यात दुचाकीचालक व त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. दोघांनाही आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ममदापूर येथील साहिल ओंकार तुमडाम (२३) व नंदकिशोर दिलीप नवराते (२४) हे. दोघेही जेवण करण्याकरिता एमएच ४९ एन ६७२६ क्रमांकाच्या दुचाकीने महामार्गाने इंदरमारीला जात होते.

सीडीएट कंपनीच्या प्रवेशव्दारासमोर एम.एच.३१ सीआर ०३२६ क्रमांकाच्या कारला समोर काहीतरी आडवे आल्याने कारचालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे मागाहून आलेले हे भरधाव दुचाकीस्वार कारला येऊन धडकले. या दोघेही गंभीर जखमी झाले असून दुचाकीसह कारचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून जमादार राजू साहू पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here