
वर्धा : केंद्र शासनाच्या सूचनांनुसार केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार वर्धा जिल्ह्यात नाफेडच्या वतीने सात केंद्रावरून चणा खरेदी करण्यात येत आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी नजीकच्या केंद्रावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यात तालुका सहकारी खरेदी-विक्री समिती, देवळी, पुलगाव, कारंजा व आष्टी तसेचकृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट व समुद्रपूर येथे आधारभूत दराने चणा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांना त्यांचेआधार कार्ड, सातबारा उतारा, पीकपेरा, आधार लिंक असलेले बँकेचे पासबुक घेऊन जाऊन ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.