महागाईविरोधात सायकल रॅली! युवक काँग्रेसचा पुढाकार; केंद्र शासनाला पाठविले निवेदन: माजी आमदार अमर काळे यांचे नेतृत्व

आर्वी : पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने कारंजा ते आर्वी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .माजी आमदार अमर काळे यांनी नेतृत्व केले.

भोयर पवार मंगल कार्यालय कारंजा येथून या सायकल रॅलीला सुरुवात झाली तळेगाव, बेलोरा, जळगाव शिरपूर येथे या सायकल रॅलीचे आगमन झाले. आर्वी येथील टी पॉर्डटवर सायंकाळी सहा वाजता या सायकल रॅलीचा समारोप झाला. आर्वी शहरातील मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत महागाईच्या विरोधात केंद्र, शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत ही सायकल रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकली, माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना केंद्र शासनाला पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले त्यानंतर ही सायकल रॅली आशीर्वाद मंगल कार्यालय येथे आली या सायकल रॅलीचा आशीर्वाद मंगल कार्यालय येथे वाजता समारोप झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here