दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार गंभीर! देवळी ग्रामीण रुग्णालयासमोरील घटना

वर्धा : देवळी येथील एमआयडीसीमध्ये जेवणाचे डब्बे पोहोचविण्याकरिता जात असलेल्या सायकलस्वारास अज्ञात दुचाकीने धडक दिली. ही घटना शनिवार 23 एप्रिल रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान देवळी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर घडली. या अपघातात सायकलस्वार शेषराव नामदेवराव शेंडे (वय 69) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी देवळी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकत तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here