लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार! आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बळजबरी अत्याचार करण्यात आल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अल्पवयीन पीडित मुलीशी विक्की नामक युवकाने मैत्री केली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले, दरम्यान विक्कीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून स्वत:च्या घरी नेत तिच्या मनाविरुद्ध बळजबरी अत्याचार केला. पीडितेने लग्नास नकार दिल्यावरही विक्कीने लग्नाचा तगादा लावून तिचे वारंवार लैंगिक शोषण करून मानसिक ञास दिला.

अखेर दररोजच्या जाचाला कंटाळून पीडितेने याबाबतची तक्रार पुलगाव पोलिसात दिली. पोलिसांनी तक्रारीवरुन विक्कीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पुलगाव पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here