अवकाळी पावसाचा तडाखा! शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

कारंजा (घा.) : अचानक वातावरणात बदल झाल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली असतानाच कारंजा तालुक्यात पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह जवळपास दीड ते दोन तास बरसलेल्या या पावसात बाजार समितीमधील व्यापाऱ्यांचे साडेतीन हाजर क्विंटलपेक्षा अधिक धान्य ओले झाले. तसेच शेतशिवारातील पिकांचीही मोठ्या प्रमाणात नासडी नासाडी झाली असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाजही व्यक्त केला आहे. खरिपाचे पिक हातचे गेल्यानंतर शेतकऱ्यांची रब्बी पिकांवर आशा असतानाच आता अवकाळीच संकट घोंगावत आहे. शेतशिवारात गहू व चण्याच्या मळणीला वेग आला असून बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

गुरुवारी पहाटेच्या सुमारास कारंजा तालुक्यात अचानक वादळी पावसाने हजेरी लावली. तब्बल दोनतास धो-धो बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचीही दाणादाण झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील व्यापाऱ्यांचा जवळपास साडेतीन हजार क्विंटल शेतमाल ओला झाला. यामध्ये गहू, चणा, सोयाबीन आणि तूर आदी पिकांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here